बुधवार, ३ फेब्रुवारी, २०२१

वरंध घाटाच्या दुरुस्तीची प्रतीक्षा संपली , काम सुरू

 वरंध घाटाच्या दुरुस्तीची प्रतीक्षा संपली , काम सुरू

महाड , ता . 3 



महाड पुणे व पंढरपूर मार्गावरील वरंध घाटाच्या  दुरुस्तीचे काम अखेर  पाच महिन्यांनंतर सुरू  झाल्याने प्रवासी व वाहन चालकांना दिलासा मिळाला आहे. 

वरंध घाटातील  संरक्षक भिंत व दुरुस्ती  कामाचे भूमिपूजन  आमदार भरत गोगावले यांच्या हस्ते  2 फेब्रुवारीला करण्यात आले . यावेळी  सहसंपर्कप्रमुख विजय सावंत  ,महाड तालुका प्रमुख सुरेश महाडिक  ,महाड सभापती सपना  सुभाष मालुसरे, जि.प सदस्य मनोज काळीजकर व संजय कचरे,  सुभाष मालुसरे, अनिल मालुसरे,  उपस्थित होते  .

मागील वर्षीच्या पावसाळ्यामध्ये वरंध घाटातील संरक्षक भिंत व रस्ता असल्याने येथील वाहतूक विस्कळीत झाली . सध्या अवजड वाहतूक बंदी असून केवळ हलकी वाहने येथून जात आहेत .

कोकण व पश्चिम महाराष्ट्राला  जोडणाऱ्या वरंध घाटातून महाड मार्गे पुणे तसेच फलटण पंढरपूर जाता येते . पुणे येथे जाण्यासाठी हा रस्ता जवळचा म्हणून वापरला जातो . महाड  परिसरामध्ये व्यापार, भाजी वाहतूक, एमआयडीसीमध्ये  कच्च्या पक्का मालाची  वाहतूक या घाटातून होत असते .परंतु गेल्या काही वर्षांपासून अरूंद असलेल्या या घाटात  पावसाळ्यामध्ये दरड कोसळणे .संरक्षक भिंती तसेच रस्ता खचणे असे प्रकार वारंवार घडत असल्याने घाट धोकादायक झालेला आहे मागील वर्षी  पावसाळ्यात घाटातील रस्ता खचल्याने व संरक्षण भिंत पडल्याने या घाटातील वाहतूक बंद करण्यात आली होती. सद्यस्थितीत या मार्गावर कमी वजनाच्या वाहनांची वाहतूक सुरू आहे. परंतु अवजड वाहने तसेच एसटी वाहतूक बंद असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत असते . एसटी प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सहन करून  या घाटाला पर्याय असणाऱ्या ताम्हीणी व महाबळेश्वर मार्गे प्रवास करावा लागतो. परंतु आता वाहन चालक प्रवाशांचा हा त्रास कमी होणार आहे .महाड सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या घाटाच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आलेले आहे काम प्रगती पथावर आल्यानंतर घाटातील वाहतूक बंद केली जाण्याची शक्यता आहे .रस्त्याच्या दुरुस्तीसाठी सुमारे तीन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून  प्रत्यक्ष रस्त्याच्या दुरुस्तीचे काम  सुरू झाले आहे. रस्त्याचे काम सुरू झाल्यानंतर प्रत्यक्ष वाहतूक पूर्णपणे बंद करण्याबाबत अधिकारी वर्ग अशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल अशी माहिती आमदार भरत गोगावले यांनी दिली.

.........

वरंधा घाटाच्या दुरूस्तीचे काम सुरू झाले असून घाटातील वाहतूक बंद करण्याबाबत जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार पुढील कार्यवाही केली जाईल आर .के .बामणे ( कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, महाड )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

महाडमध्ये लवकरच नगरपालिकेची प्रशस्त इमारत

  महाडमध्ये लवकरच नगरपालिकेची प्रशस्त इमारत  महाड , ता .१४ दीडशे वर्षांहून अधिक वर्षांची परंपरा असलेल्या महाड नगर परिषदेची 8 कोटी रुपये खर्च...